वाहनातील डिझेल चोरण्याचा प्रयत्न; मुखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल.
Mukhed News Mukhed News
1.23K subscribers
434 views
0

 Published On May 3, 2024

मुखेड तालुक्यातील दबडे शिरूर गावचे शिवारातील कॅम्पवर उभे केलेल्या वाहनातील डिझेल चोरण्याचा प्रयत्न; मुखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल.

मुखेड पोलीस ठाण्यातून दिनांक ३ मे रोजी मिळालेल्या माहितीवरून दिनांक २७ एप्रिल रोजी रात्री १:०० वाजता दबडे शिरूर गावचे शिवारातील कॅम्पवर उभे असलेले वाहन टिप्पर रोलर ग्रेडर या वाहनाच्या डिझेल टॅंक मधून पाईप टाकून ४ जणांनी मिळुन डिझेल चोरताना उमराव माधवराव करताळे यांनी पाहिले. त्यांच्यापैकी एक पळून गेले त्यानंतर फिर्यादी जयराम मनोज मोरे यांनी घटनेची विचारपूस करून याबाबत खात्री झाल्याने चौघांवर उभे असलेल्या वाहनांमधील डिझेल चोरण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून जयराम मोरे यांच्या तक्रारीनुसार मुखेड पोलीस ठाणे येथे गुरन १४६/२०२४ कलम ३४, ३७९, ५११ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

show more

Share/Embed